29 Police commemoration day -
29 Police commemoration day -
21 अॅक्टोबर 1956 ह्या दिवशी CRPF च्या किरणसिंग ह्या पोलिस सब इन्स्पेक्टर् च्या नेतृत्वाखाली अक्साईचीनच्या
दुर्गम भागात 16,000 फुटावर असलेल्या Hot Springs ह्या ठिकाणी गस्त घालत असलेल्या आपल्या 10 जवानांवर चिनी सैनिकांनी
अचानक हल्ला करून त्यांना ठार मारलं. त्यावेळी अतिशय शौर्याने शेवटपर्यंत लढलेल्या
आणि हौतात्म्य पत्करलेल्या ह्या जवानांना मानवंदना देण्यासाठी आजही देशभरातून प्रत्येक
प्रांताचं प्रतिनिधित्व करणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी ले ते हॉटप्रिंग हा खडतर प्रवास
करून तिथे पोचतात; आणि पुष्पचक्र वाहून त्यांना सलामी देतात. ले ते फोब्रांग गाडीचा
रस्ता आहे. त्यापुढे मात्र पायी तर कधी खेचरावरून हा रस्ता पार करावा लागायचा. आतामात्र
शेवटपर्यंत गाडी जाऊ शकते. ह्या हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी प्रवीण त्यादिवशी
पहाटे हेलिकॉप्टरने जात असे. हिमपात आणि थंडीमधे वाचवलेली थोडीशीच फुलं आणि पानं यांची
दोन तीन सुबक पुष्पचक्रं तयार करायचं काम दोर्जे फार कलात्मकपणे करत असे. हॉटस्प्रिंगला उंटाच्या रंगाच्या
वाळूच्या गालिच्यावर ही हसरी फुलं मरणालाही हसणा र्या जवानांना दिवसभर सोबत
देत.
भारतभरही हा दिवस पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळला
जातो. कर्तव्य पार पाडतांना हौतात्म्य प्राप्त झालेल्या भारतभरच्या पोलिसांची आठवण
मनात तेवत ठेऊन त्यांना श्रद्धांजली दिली जाते.
------------------------
Comments
Post a Comment