2 ले ह ला ब द ली - भारतीय पोलीस सेवेतील (भा.पो. से. - - IPS ) ऑफिसरशी - प्रवीण दीक्षितांशी लग्न केलं आणि ‘बदली’ नावाच्या जादूच्या चटईने आम्हाला अदृष्टपूर्व, अद्भुत अशा ठिकाणांची सफर घडवायला सुरवात केली. 1986-1989 ला मुंबईच्या पेडररोडची उपवाहिनी असलेल्या गामाडिया रोड वर एका मस्त आलिशान (सरकारी कृपेनी मिळालेल्या ) प्लॅटमध्ये आम्ही राहत होतो. इटालियन टाइल्सनी बनविलेलं गालिचासारखं प्लोअरिंग, पितळी कड्यांचा सागवानी झोपाळा, कणादशी- - आमच्या मुलाशी - - - क्रिकेट खेळायचं म्हटलं तर पीच तयार होईल इतका विस्तीर्ण हॉल, सुंदर डायनिंग हॉल, मोठाले टब्स सामावून घेणार्याया बाथरूम्स, हवेशीर किचन,सर्व्हंट क्वार्टर,मोठ्या मोठ्या स्टोअररूम्स अशा सर्व अद्ययावत् सोयींनी घर परिपूर्ण होतं. ‘ अस्स घर सुरेखबाई खेळाया मिळतं’ म्हणत आम्हीही धम्माल करून घेतली. बाँबे स्कॉटिश सारख्या नावाजलेल्या शाळेत कणादला इयत्ता 1ली साठी अॅडमिशनही मिळाली आणि त्याच बरोबर पोहण्यात प्रावीण्यही! कधी वरळीचा तरणतलाव तर कधी...
Comments
Post a Comment