35 बोफोर्स –

 

35 बोफोर्स

               त्यावेळी अनेक कारणांनी गाजलेलं नाव होतं बोफोर्स! बोफोर्स ह्या नावाभोवती अनेक प्रकारच्या प्रसिद्धीची वलयं निर्माण झाली होती. व्ही. पी. सिंगांची रोजची भाषणं त्यात होणारे बोफोर्स, स्विडिश् बँक, लोटस् हे सगळे वारंवार होणारे उल्लेख याने डाऊनमधे हवा चांगलीच तापली होती. प्रत्यक्ष बोफोर्स जिथे वापरल्या जात होत्या तिथे मात्र सारं कसं शांत शांत! खाली होणार्‍या रणधुमाळीच्या धुळीचा कणही वर पोचत नव्हता. त्यामुळे बोफोर्स आहे कशी हे पहायला आम्हालाही भलताच उत्साह होता. बोफोर्सना घेऊन जाणार्‍या स्कॅनिया नावाचे ट्रक ऍटोमॅटिक गिअरचे असतात हेही अद्भुत वाटत होतं. कारण तेंव्हा अँबेसिडरचाच रुबाब होता. तर लद्दाखमधे जोंगाचा! भारतात मारुतीचा जन्मही नुकताच झाला होता. मग ह्या नवनवीन गाड्यांची काय कथा. गोवळकोंड्यांची मुलुखमैदान पाहिली तेंव्हा जसं धन्य वाटलं त्याच्या कितीतरीपट अजुन बोफोर्स पाहून धन्य वाटलं. 360 अंशात फिरणारी, हिमालयातही दुर्गम भागात  अगदी सियाचनवर पोहचू शकणारी 22 ते 28 कि.मी. लांबपर्यंत मारा करणारी तोफ प्रत्यक्ष पहातांना लेचं पोस्टिंग ही आमच्यासाठी आकाशातून प्राप्त झालेली अपूर्व संधीच होती. “वहिनी काय चालवताय का स्कॅनिया?एकदम सोपी आहे चालवायला.” ऍम्बॅसिडरनंतर ऍटोमॅटिक गिअरची स्कॅनिआ चालवायचं भाग्य लाभल्याच्या आनंदात पुढचे कित्येक दिवस मी ढगातून चालत होते. नंतर कित्येक वर्षांनी बाजारात आलेल्या इंडिका आणि सँत्रो आमची गाडी स्त्रियांना चालवायला सोपी आहे अशी जाहिरात करत होत्या. पण स्कॅनिया ती स्कॅनियाच!

-------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -