34 Hall of Fame –

 

34 Hall of Fame


               लेच्या सगळ्या प्रेक्षणीय स्थानांबद्दल बोलतांना माझ्या मनात आजही कायम जपलेली एक गोष्ट आहे. लेच्या एअरपोर्टशेजारी भारतीय सैन्याला अभिमान वाटायला लावणारे स्थळ म्हणजे Hall of Fame. तिथे 1947 पासून पुढच्या सर्व युद्धांचे फोटोग्राफ्स् , माहिती व महत्त्वाच्या स्मृती जपलेल्या आहेत. लडाखला जाणार्‍या प्रत्येकाने लडाख समजून घेण्यासाठी येथे भेट दिली पाहिजे. अतिशय दुर्गम वाटणारी ही अती शीत भूमी कायम युद्धभूमी म्हणूनच धगधगत राहिली आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्यावेळचे अनेक फोटो तिथे ठेवलेले आहेत. आपल्या भारतीय सैन्याने थेट पाकिस्तानात लाहोरपर्यंत मुसंडी मारली. त्यावेळी तिथून विजयाचं प्रतीक म्हणून उचलून आणलेला `Lahor 8k.m.' दर्शविणारा मैलाचा दगड आजही मला स्मरतो. कोहिनूरपेक्षा ह्या दगडाचं महत्त्व तेंव्हाही मोठं वाटलं होतं , आहे आणि राहीलही.

-----------------------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -