Posts

45 लॅमडॉनचा निरोप –

  45 लॅमडॉनचा निरोप –                            बघता बघता दोन वर्षांचा काळ कसा पुढे गेला हे कळलच नाही. आज ‘ले ’ च्या ‘लॅमडॉन’ शाळेत सायन्स टीचर म्हणून शिकवायचा माझा शेवटचा दिवस होता.प्रवीणची बदली झाली आणि मलाही शाळा सोडून परत जाणं भाग होतं. मुलांच्या आठवणींनी भरलेला दोन वर्षांचा काळं मी मनाच्या पुस्तकात मोरपिसासारखा कायमचा जपून ठेवणार होते. परत निवांत वेळी, एकांतात, गतकाळाच्या ह्या सुंदर पिसाचा आठवणींचा देठ धरून मी पुन्हा पुन्हा माझ्या मनाच्या पानांमधून ओढत हे गतकाळाचं पीस फुलवणार होते. माझ्या मनात परत ते जिवंत करणार होते. आठवणींच्या मोरपिसाचे प्रत्येक धागे वेगवेगळे होऊन फुलून येणार होते. लहानपणी आम्ही म्हणायचो पीस जिवंत झालं! तसे सगळे अनुभव जिवंत होणार होते. मोरपिसाला असलेल्या डोळ्यामधून मी इतरांना न दिसणारा ‘ले’चा भूतकाळ बघणार होते. कृष्णानी मुकुटात जपलेलं मोरपीस, गोकुळाच्या अशाच रंगीत मखमली आठवणी त्याला सतत सोबत करत असतील का?    ...

44 कणाद -

  44 कणाद -                     बाबांच्या बदल्यांमुळे बाबांसोबत निरनिराळ्या गावांना फिरतांना सर्व साधारण मुलांना फारसा माहीत नसलेला एक शब्द कणादला चांगलाच माहित झाला होता. T.C. - - Transfer certificate! लेमधली तिसरी पर्यंतची ही त्याची पाचवी शाळा होती. अलिबागच्या देवळात भरणार्‍या शाळेपासून दिल्लीच्या `ब्ल्यू बेल्स' ते मुंबईच्या `बॉम्बेस्कॉटिश' सारख्या टाइट अपर लिप अ‍ॅक्सेंटच्या शाळेमधून लेमधल्या सेंट्रल स्कूल मधे येऊन तो दाखल झाला. मराठी मिडियमच्या माझ्या अट्टाहासाप्रीत्यर्थ त्याला मुंबईच्या मराठी शिशुविहार शाळेतही दाखलं केलं होतं. पण दिल्लीला बदली झाल्यावर त्याच्या इंग्रजी माध्यमावर शिक्कामोर्तब झालं. त्याला हिंदी, इंग्रजी अशा कुठल्याच भाषा येत नसल्याने त्याच्या बाईंनीच कपाळाला हात लावून घेतला. पण त्याचं काहीच आडलं नाही. कुठलीच सामाईक भाषा येत नसलेला सोमालियाचा लिल्याम, कलकत्याचा एषु (म्हणजे त्याचं नावं एषु नव्हतं. पण दंगा करत त्याच्या इकडे तिकडे पळण्यामुळे त्याची आई त्याला कायम ए...

43 सण आपले-तुपले - - - दिवाळी आणि बुद्धपौर्णिमा -

  43 सण आपले-तुपले - - - दिवाळी आणि बुद्धपौर्णिमा -                           आम्ही लेला गेल्यानंतर लगेचच आलेली दिवाळी बुखारी शेजारी आणि जाड जाड नवनवे कोट चढवूनच पार पडणार की काय असं वाटत होतं. बाहेरच्या उणे अंशानी   फटाक्यांनाही उणे करून टाकलं होतं. आणि फटाके उडवायची कोणाला खूप हौस असली तरी फटाके ह्या गोष्टीचं नावही बाजारात माहित नव्हतं. विमानाचा प्रवास फटाक्यांना सोसवणारा नव्हता. किंवा फटाक्यांचा विमानप्रवास विमानाला मान्य नव्हता. पणती लावणंही शक्य नव्हतं. बाहेर वाहणार्‍या बर्फाच्या तुफानी वार्‍यानी ‘ये कहानी है दिये की और तुफान की’ हे खर करून दाखवलं. पांढर्‍या बर्फावर पांढरी रांगोळी उठून दिसणार नव्हती. पोहे, रवा ह्या पदार्थांनी रजा घेतली होती. मी आनंदात होते मला दिवाळी साजरी करण्यापलिकडे काहीच करायचं नव्हतं. दिवाळी साजरी करायची म्हटलं की साजरी करायचीच हा उत्साह कोणी हिरावून घेऊ शकत नव्हतं. आमच्या मित्रांचं दिवाळीच्या पार्टीचं आमंत्रण होतंचं. ...

42 झन्स्कारच्या काठावरील अद्भूत प्रवास नीमू ते ले

  42 झन्स्कारच्या काठावरील अद्भूत प्रवास नीमू ते ले                             दरवेळी वाईटच अनुभव मनात कायमचे कोरले जातात असं नाही तर अमृताच्या निस्यंदिनीसारखे कितीतरी चांगले अनुभव सतत चांगल्या आठवणी तुमच्या मनात झिरपत ठेऊन तुम्हाला आनंदित करतात. फुलावर पडलेल्या दवबिंदूंसाखे काही सुंदर क्षण अचानक भेटून जातात.                          निमूला 5div च्या जनरलने ठेवलेल्या पार्टीहून परततांना आम्हाला उशीर झाला. बाहेर आलो गाडीत बसलो. गाडीने रस्ता मागे टाकायला सुरवात केली. आकाशभर चांदण्या फुलल्या होत्या. डोंगराच्या मागून पूर्ण चंद्र वर येत होता. त्या तळपणार्‍या चंद्रप्रकाशात जागेपणी एक स्वप्न समोर उलगडत जात होतं. डावीकडे उंच उंच पर्वत रांग चंद्रप्रकाशाच्या शुभ्र झोतांमधे भिजून,...

41 प्रमोद-

  41 प्रमोद-                         बरेच दिवस लद्दाख मधे राहिल्यावर लक्षात आलं की आपण फक्त भौगोलिकरित्याच आपल्या माणसांपासून दुरावलो नाही तर अनेक घडून गेलेल्या चांगल्या वाईट घटना टिपकागदासारख्या हिमालयाने मधेच टिपून घेतलेल्या असत. x-ray department मधे किरणोत्सर्ग होऊ नये म्हणून केलेल्या led च्या भिंतींप्रमाणे आख्खा हिमालय डाऊनच्या सर्व घडामोडींमधे आणि आमच्यामधे अभेद्य भिंतीसारखा उभा होता.   घटनांचा ओलावा , त्यांच्यातल्या सुखदुःखाच्या छटा आमच्यापर्यंत न पोचता आम्ही तसेच निर्लेप राहून गेलो होतो. भारतात नवीन सरकारं येत होती. गडगडत होती. मंडल आयोगाची धुमश्चक्री चालू होती. राजीव गांधींची हत्या होऊन भारतभर त्याचे पडसाद उमटत होते. पण आमच्याकडे मात्र सारं काही शांत शांतच होतं. अगदी तिथल्या पर्वतराजीसारखे! 16 ऑगस्ट 91ला अचानक घरी फोन आला. “प्रमोद गेला”! एवढच बोलून प्रवीण पुढच्या कामाला लागला. विश्वासच न बसता गोंधळल्यासारखी मी प्रवीणच्या पुढे मागे फिरत होते. पण तो ऑफि...

39 काराकोरम - 40 कारगील ते झन्स्कार -

  39 काराकोरम -                                लद्दाखमधल्या अनेक चार्मिंग धकधक गर्लस् पैकी ही एक! एक फूल दो काटे किंवा एक फूल दो माली सारखं एक खिंड आणि पाच देश अशी चार्मिंग! भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन आणि रशिया ह्या पाच देशांच्या सीमा इथे येऊन मिळतात. त्यामुळे सर्वच देशांच्या कडेकोट बंदोबस्तात असलेली. पूर्वीपासूनचा सिल्क ट्रेडरूट इथूनच जायचा. दौलत बीन ओल्दी ( DBO ) हे Indo Tibetan Border police ( I.T.B.P. ) च आपलं तिकडचं शेवटचं पोस्ट. प्रवीण चॉपरने तिथे जाणार होता.   ह्या सरकारी चॉपरमधे मला परवानगी नव्हती.   आपल्या संस्कृतीत हाताला हात लावायची पद्धत आहे. जिथे आपण जाऊ शकत नाही तिथे चॉपरने पोचू शकणार्‍या नवर्‍यच्या हाताला हात लावून संजयासारखं प्रत्यक्ष रणभूमीवर न जाता सगळा प्रवास मी प्रवीणच्या डोळ्यांनी   पहाणार होते आणि त्याच्या तोंडून ऐकणार होते. अती अती उंच काराकोरम पर्वतराजीतून वाट काढत, प्रतिकूल हवेशी सा...

38 लडाखचे वन्य जीवन आणि वनस्पती -

  38 लडाखचे वन्य जीवन आणि वनस्पती -                      ह्या गोष्टीतील धर्मराज, भीम, द्रौपदी हे जरी आज नसले तरी इथल्या थंडीतही टिकाव धरू शकणारी केसाळ आणि अंगापेराने दणकट भटकी कुत्री लेपासून गुमरीपर्यंत आढळतात. तुमची गाडी रस्त्यावरून चालली असतांना आजूबाजूला असलेल्या ओसाड प्रदेशातून अचानक मागच्या दोन पायावर उभं राहून तुम्हाला न्याहळणारे झुपकेदार शेपटीचे लहान कानांचे मरमॉटस् सशांचे किंवा खारींचे दुसरे मोठे भाऊबंदच. त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून जाणारं तुमच्याविषयीचं कुतूहल आणि गवत कुरतडण्यासाठीचे असलेले पुढचे दोन बनी सारखे दात खूपच गोजिरवाणे! थंडीला तोंड देण्यासाठी अंगावर साठवलेली चरबी आणि त्यामुळे गुबगुबीत आणि बाळसेदार दिसणारी ही बाळं आपण जवळ जाताच सुळकन् पळून बिळात गायब होतं. माऊंटन गोट म्हणजे डोंगरातल्या बकर्‍या किंवा बकरे अवघड कड्यांवर चढून मिळेल ते गवत ओरबाडतांना दिसत. दरवर्षी त्यांची जुनी शिंगं गळून त्यांना नवीन शिंगं येतात. त्यामुळे ठिकठिकाणी ही शिंगं म्हणजे अँटलर्स सापडतात....